। नागोठणे । वार्ताहर ।
महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण राज्यभरात उपायोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून कोएसोच्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलातील गु.रा.अग्रवाल विद्यामंदिर येथे जाऊन विद्यार्थिनी व शिक्षिकांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेकडून (उबाठा) अग्रवाल विद्यामंदिरचा मुख्याध्यापिका राधिका ठाकूर यांना एक निवेदन नुकतेच देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य डॉ.मिलिंद धात्रक यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच अखलाक पानसरे, अशफाक पानसरे, सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, धनंजय जगताप, अनिल महाडिक, जितेंद्र जाधव, सतीश पाटील, अंकुश जैन, पंकज कामथे, रुपेश जगताप आदी उपस्थित होते.