आदिवासी महिलांना साड्या वाटप

। नेरळ । वार्ताहर ।
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते भास्कर देसले यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यातील चौढारवाडीमधील आदिवासी महिला यांना साड्या वाटप केल्या. मोग्रज ग्रामपंचायतीचे सदस्य आणि माजी उपसरपंच विलास भला यांच्या माध्यमातून 100 महिलांना साड्या वाटप केल्या. यावेळी मोग्रज उपसरपंच प्रकाश थोराड, आंबिवली आदिवसी सहकारी सोसायटीचे चेअरमन अशोक मेचकर, ज्येष्ठ नेते गणपत अगिवले, शंकर चौधरी, विलास भोईर, रमेश मराडे, सागर म्हसे, भाऊ भगत, संतोष मेचकर, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version