संत निरंकारी मिशनतर्फे महिलांना साडी वाटप

चिपळूण | प्रतिनिधी |
सदगुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या कृपेने संत निरंकारी चरिटेबल फाऊंडेशन तर्फे नुकतेच चिपळूण आणि परिसरातील 143 गरजू महिलांना दिपावलीचे औचित्य साधून साडी वाटप करण्यात आले.चिपळूणच्या पुरग्रस्त भागातील गाढव तळ,मुरादपूर कुभारवाडी,बहाद्दूरशेख नाका,कळंबस्ते- गुरववाडी,शिगवणवाडी,कदमवाडी, सती चिंचघरी इत्यादी भागात हे साडी वाटप करण्यात आले.
हा साडी वाटप कार्यक्रम क्षेत्रीय प्रबंधक गंगाधर विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुरंबव ब्रँचचे मुखी मधुकर पंडित तसेच घोणसरे ब्रँचचे मुखी लक्ष्मण बोबले यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी सेवादल युनिट क्र.801 चे संचालक हरिश्‍चंद्र साळुंखे उपस्थित होते.संत निरंकारी चरिटेबल फाऊंडेशन नेहमीच सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देत आले आहे.

Exit mobile version