तृषा धनावडे हिच्या वाढदिवसानिमित्त दप्तरांचे वाटप

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील पोटलज बुद्रुक येथील तृषा धनावडे हिच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रा जि प शाळा पोटलज बुद्रुक आणि डुबेवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले.

यावेळी अंकुश धनावडे, सूर्यकांत धनावडे, चंद्रकांत धनावडे, शोभा धनावडे, सतीश धनावडे, प्रशांत धनावडे, दिलीप धनावडे, ग्रामस्थ शिक्षक स्वाती घुळे, गीतांजली, धुळगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version