280 विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

| पाताळगंगा | वार्ताहर |

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चौक जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे व वावर्ले सरपंच प्रिया विचारे यांच्या माध्यमातून मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधत व अर्णव विचारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंबेवाडी व बोरगाव ग्रामपंचायत येथील जवळपास 280 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य झळकत असल्यांचे पाहायला मिळाले.

यावेळी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, पाश्चिमात्य संस्कृतीत आपली मराठी भाषा टिकवण्यासाठी जिल्हा परिषदेची शाळा टिकणे तितकेच महत्त्वाचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आधुनिक स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिक्षण घेणे काळाची गरज असून शिक्षणामुळे स्वतःची उन्नती होऊन समाजात चांगले काम करण्यासाठी योग्य दिशा मिळते, असे गौरउद्गगार तालुका प्रमुख पिंगळे यांनी या उपक्रमात काढले.

यावेळी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्क प्रमुख उमेश गावंड, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी पंचायत समिती सदस्या कमल भस्मा, शिवसेना विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे, उपसरपंच रोशन मोरे, आदि प्रमुखासह बोरगावचे मुख्याध्यापक भालोदेकर सर, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version