| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी पाताळगंगा परिसरातील अतुल दत्तात्रेय मालकर यांच्या प्रयत्नातून तसेच, लायन्स क्लब ऑफ यांच्यामार्फत राजिप शाळा तळवली व राजिप शाळा वडगाव डोंगरवाडी येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना टिफीन बॉक्स, कंपास पाउच, पेन, पट्टी, खोडरबर व इतर साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले. यावेळी राजिप शाळा तळवली येथील मुख्याध्यापक बोरगे, उपशिक्षक मांडे तसेच लायन्स क्लब ऑफ पनवेल सर्गमचे अध्यक्ष प्रेमेंद्र बहिरा, सदस्य गोडसे, गावातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर मालकर, अतुल मालकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल वाघे शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष प्रभाकर वाघे व समिती सदस्य उपस्थित होते. तसेच, वडगाव डोंगरवाडी येथील मुख्याध्यापिका पाटील, उपशिक्षिका मुंढे, ग्रामस्थ उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ पनवेल सर्गम व सामाजिक कार्यकर्ते अतुल मालकर यांच्यामार्फत डोंगरवाडीला एक उत्तम शाळा तयार व्हावी, यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील, असे सांगण्यात आले. दोन्ही ठिकाणी कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.







