लायन्स क्लबच्या मार्फत ग्रामीण महिलांना शिवणयंत्र वाटप

| अलिबाग | प्रतिनिधी |

लायन्स क्लब पोयनाडने ग्रामीण महिलांनी स्वयंरोजगार करुन स्वत:च्या पायावर उभे राहावे, या हेतूने 5 गरजू ग्रामीण महिलांना शिवणयंत्र वाटप केले. शनिवारी (दि. 16) लायन्स व्हिजन सेंटर, पोयनाड येथे या शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ओरिएंटल इन्शुरन्सचे वरिष्ठ अधिकारी संजय शिर्के, ओरिएंटल इन्शुरन्स, पनवेलचे ब्रँच मॅनेजर मिथिलेश चौबे, बिझीनेस असोशिटस राजू शहा, बिझीनेस असोसिएटस गिरीश फडके, ओरिएंटल इन्शुरन्सचे मॅनेजर शंकर अय्यर, बिपीन नवसारीवाला, बी.डी. मोटा, लायन्स क्लब पेण प्राईडचे सचिव प्रदीप पाटील, लायन्स हेल्थ फाऊंडेशन, चोंढीच्या सीईओ डॉ. शुभदा कुडतरकर, डॉ. हर्षल गोरे, सामाजिक कार्यकर्ता गंभीर पाटील, सुरेश पाटील, साहित्यिक उमाजी केळुसकर, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष प्रमोद राऊत, प्रदीप सिनकर, प्रमोद पाटील, मनीष अग्रवाल, महेंद्र पाटील, अरविंद अग्रवाल, विकास पाटील, प्रगती सिनकर, ममता अग्रवाल आदी उपस्थित होते.

प्रारंभी विकास पाटील यांनी लायन्स क्लब पोयनाडच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. लायन्स हेल्थ फाऊंडेशन, चोंढीच्या सीईओ डॉ. शुभदा कुडतरकर यांनी सोगाव येथे बांधण्यात येत असलेल्या लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या सुपर स्पेशालिटी डोळ्यांच्या हॉस्पिटलबाबत माहिती देऊन या कार्याला दानशुरांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले, तर ओरिएंटल इन्शुरन्सचे वरिष्ठ अधिकारी संजय शिर्के यांनी ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिवणयंत्र देण्याचे आदर्श काम लायन्स क्लब पोयनाडने केले असल्याचे सांगितले.

याप्रसंगी प्रीती निलेश पाटील, कातळापाडा, आरती भावेश कोटक, पोयनाड, कुसुम अनंत पाटील, खिडकी, चारुशिला अरुण थळे, कोपर, प्रणिता बिपीन पाटील, पिंपळपाडा यांना शिवणयंत्राचे वाटप करण्यात आले. या महिला लायन्स क्लब पोयनाडच्या या मदतीने भारावून गेल्या. सद्गतीत झाल्या. लायन्स क्लब पोयनाडने शिवणयंत्र देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास जी मदत केली, त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Exit mobile version