। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लायन्स क्लब मांडवा व लायन्स क्लब पोयनाड या दोन्ही क्लबचा 2022-23 या वर्षासाठीचा पदग्रहण व शपथविधी सोहळा होराईझन मंगल कार्यालयामध्ये बुधवार, 6 जुलै रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात लायन्स क्लब मांडवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळकृष्ण कोळी आणि लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष विकास पाटील यांनी शपथग्रहण करुन आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली.
याप्रसंगी मांडवा आणि पोयनाड या दोन्ही क्लबच्या नवीन सदस्यांचा शपथविधी व अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांचे पदग्रहण करण्यात आले. लायन्स क्लब मांडवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळकृष्ण कोळी, उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव सुमीत पाटील, खजिनदार विलास पाटील यांनी, तर लायन्स -पोयनाडचे नवनिर्वाचित अध्यक्ष विकास पाटील, उपाध्यक्ष प्रमोद राऊत, सचिव ओमकार जोशी, खजिनदार कौस्तुभ जोशी यांनी आपापल्या पदाची सूत्रे हाती घेतली.
या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब मांडवाचे लायन्स सुबोध राऊत, नितीन अधिकारी, अरविंद घरत, अमीष शिरगावकर, धवल राऊत, अभिजीत गुरव, विद्या अधिकारी, जितेश्री ठाकूर, डॉ. सुबोध नाईक, डॉ. राजाराम हुलवान, अनिल म्हात्रे, तसेच लायन्स क्लब पोयनाडचे मनीष अग्रवाल, दिलीप गाटे, विनोद पाटील, अरविंद अग्रवाल, मनोहर चवरकर, महेंद्र पाटील, अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष भगवान मालपाणी, तसेच प्रवीण सरनाईक, नयन कवळे, महेंद्र पाटील, लायन्स क्लब मांडवा आणि लायन्स क्लब पोयनाड या दोन विभागांच्या सदस्यांच्या पदग्रहण व शपथविधी समारंभासाठी मुकेश तनेजा, संजीव सूर्यवंशी,अनिल जाधव, प्रदीप सिनकर, महेश मोघे, झोन चेअरमन अंकीत बंगेरा आदी मान्यवर उपस्थित होते. आदींची उपस्थिती होती.