आदिवासींना मिठाई, कपडे वाटप

वनवासी कल्याण आश्रमचा स्तुत्य उपक्रम

| उरण | वार्ताहर |

सालाबादप्रमाणे वनवासी कल्याण आश्रम उरण तालुका यांच्यावतीने दीपावलीनिमित्त मिठाईवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कोप्रोली वाडी, विंधने वाडी, कांठवली वाडी, जांभुळपाडा, वेश्‍वी वाडी अशा पाच वाड्यांवर मिठाई वाटप करून जनजाती बांधवांचे दिवाळी गोड करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कोप्रोली, विंधणे जांभुळपाडा या वाड्यांवर नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. विंधने वाडीवर बालसंस्कार वर्गातील मुलांनी सुंदर कविता बोलून दाखविली. उरण येथील बगाडे मॅडम यांनी सूचविलेल्या ज्या गुणी मुलाचा आम्हाला शोध घ्यायचा होता तो प्रत्यक्ष तिथे आम्हाला दिसला, आणि हा किल्ला बनवून त्याने त्याच्यातील कलागुणांची छोटीशी चुणूकच आम्हाला दाखवून दिली, अशी माहिती मनोज ठाकूर यांनी दिली.

सर्व वाड्यांवर भगवान बिर्सा मुंडा यांचे जयंतीनिमित्ताने भित्तीपत्रे चिकटविण्यास आली. यावेळी तेथील जमलेल्या सर्व जनजाती बांधवांना येत्या विधानसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेल्या मतदानाचा अधिकार वापरून 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन वनवासी कल्याण आश्रमच्यावतीने अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी केले.

या कार्यक्रमासाठी सहसचिव कुणाल शिसोदिया, कोकण प्रांत बाल संस्करवर्ग प्रमुख सुनंदा कातकरी, अ‍ॅड. आकाश शाह, सोहम दर्णे, सुश्मिता दर्णे, अद्वैत ठाकूर, ऋग्वेद ठाकूर, अर्णव ठाकूर, निहाल गुडेकर ही मंडळी वाडीवरील जनजाती बांधवांना आनंद देण्यासाठी उपस्थित होते. बिना इंनवेस्टरचे विपुल शहा, सुशील दर्ने, जितेंद्र पटेल यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले.

Exit mobile version