। सोगाव । वार्ताहर ।
इस्लाम धर्मात ईद मिलाद-उन-नबी हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. चोंढी येथे सोमवारी (दि.16) ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांकडून अलिबाग-रेवस मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना सरबत वाटप करण्यात आले. यावेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी चोंढी येथील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ईद-ए-मिलाद निमित्त या दिवशी गरिबांना दानही केले जाते. यानिमित्ताने चोंढी येथील मुस्लिम बांधवांकडून अलिबाग रेवस मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना सरबत वाटून हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी ईद-ए-मिलाद निमित्त चोंढी येथील मुस्लिम बांधवांना आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी चोंढी येथील आसिफ मलिक, मुस्तफा सय्यद, लियाकत शेख, अब्दुलरेहमान मलिक, निसार चोगले, आलम खान, सिराज माजगणकर, दानिश मलिक, साहिल कर्वेकर, कैस कर्वेकर, अमान कर्वेकर, आसिर माजगणकर, सैबाज चोगले, अरमान मलिक, नदीम आत्तार, मुझफ्फर आत्तार, बदरुद्दीन मुजावर, साकीब कुरेशी आदी मुस्लिम समाजातील अनेक बांधव उपस्थित होते.