। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील कुणबी भवन हॉलमध्ये रविवारी (दि.22) सकाळी 11 वाजता अविष्कार फाउंडेशन इंडिया कोल्हापूर या सामाजिक संस्थेतर्फे रायगड शाखेच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षक, शिक्षिका तसेच पत्रकार यांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान माणगाव येथीलउद्योजक विजय मेथा हे भूषविणार असून या कार्यक्रमाला रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना रायगड अध्यक्ष सोपान चांदे, सुवर्णा जाधव, फाउंडेशनचे संस्थापक संजय पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संस्थेच्या नवीन पदाधिकार्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निवडपत्र देण्यात येणार असून संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे यांची केंद्र प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे.