आत्करगाव येथे वृक्ष वाटप

| रसायनी | वार्ताहर |

प्रसोल केमिकल्स लिमिटेड होनाड, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट रसायनी पाताळगंगा तसेच गृप ग्रामपंचायत आत्करगाव यांचा संयुक्त विद्यामानाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुधवारी (दि.19) जिल्हा परिषद शाळा कुंभेवाडी आत्करगाव येथे वृक्षरोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच, नागरिकांना वृक्ष वाटप करुन त्यांचे महत्व सांगण्यात आले. यावेळी सरपंच शर्मिला भोईर, गणेश पाटील, उत्तम माने, संदीप खोपकर, संदीप पाटील, अरुण गोविंद जाधव, योगेश पाटील, गणेश सूर्यवंशी तसेच ग्रामस्थ मंडळ, जिल्हा परिषद शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version