| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल शहर शिवसेनेतर्फे पनवेल म.न.पा. दगडी शाळा क्रं 2 येथे वृक्षारोपण तसेच शालेय विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप करण्यात आले. यावेळी रमेश गुडेकर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्यांचे तर राहुल गोगटे यांच्या माध्यमातून छत्रीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राहुल गोगटे यांनी केले होते. यावेळी रमेश गुडेकर, नगरसेवक, प्रथमेश सोमण, प्रसाद सोनवणे, अभिजित साखरे, शैलेश जगनाडे, अर्जुन परदेशी, खंडेश धनावडे, गुलाब बागवान, विक्रम पाटणकर, सुजन मुसलोंडकर, राहुल गोगटे, शाळेचे मुख्याध्यापक सुजित म्हात्रे, वैभव पाटील, वैशाली सावळे, अर्चना माने, स्वाती पाटील आदींचे सहकार्य लाभले.







