| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील स्वच्छता आणि आरोग्य विभागातील सफाई कामगारांना गणवेश आणि ईएसआयसीई कार्डचे वाटप करण्यात आले. म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियन आणि श्री बापदेव महाराज सहकारी संस्था यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
कर्जत नगरपरिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन तसेच श्री बापदेव महाराज सहकारी संस्था यांच्या वतीने गणवेश आणि ईएसआयसीई कार्ड यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कर्जत शहरातील बुद्धनगर येथील समाज मंदिर हॉल येथे आयोजित कार्यक्रमाला म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन सरचिटणीस अनिल जाधव, कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राहुल डाळिंबकर, नगरपरिषद आरोग्य निरीक्षक रुपेश भोईर, लोणावळा नगरपरिषदेचे पथविक्रेता समितीचे हर्षल होगले तसेच कर्जत नगरपरिषद मधील कामगार युनियनचे राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.







