| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका काँग्रेस कमिटीचे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. माजी तालुका अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरविंद पाटील यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
कर्जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय गवळी यांच्या पुढाकाराने पक्षाचे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यकांत पाटील, जॅकी नजे, जगन्नाथ शेळके, सीताराम बदे, अय्याज डोंगरे, डॉक्टर सेल जिल्हा अध्यक्ष डॉ. संतोष सदावर्ते, नेरळ शहराध्यक्ष आनंद मोडक, युवक कर्जत तालुका माजी अध्यक्ष मनीष राणे, राहुल तरे, सुरज पंडित आदी उपस्थित होते. या कार्यालयाला शिवसेनेचे उप तालुका प्रमुख अंकुश शेळके, मिलिंद विरले, मनसेचे तालुका उपाध्यक्ष मिलिंद मिसाळ आदी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.





