आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

| नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यात आदिवासी आणि कर्णबधीर मुलांसाठी काम करणार्‍या मुंबई येथील शुभ्रा प्रकल्पाकडून चिंचवली, डिकसळ तसेच भाऊसाहेब राऊत ज्युनियर कॉलेजमध्ये 15 आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. त्यावेळी भाग्यश्री आपटे यांनी तालुक्यात आदिवासी आणि कर्णबधीर विद्यार्थ्यासाठी काम करताना जी जी मदत करता येईल ती मदत आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी डी वाखारकर यांच्यासह शुभ्रा प्रकल्पच्या प्रमुख सामाजिक कार्यकर्त्या भाग्यश्री वर्तक, सुजाता आपटे, किशोर गायकवाड यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा मोहन शेळके तसेच प्रा सायली थोरवे आणि कुणाल माने यांनी केले होते.

Exit mobile version