पाताळगंगा | वार्ताहर |
ग्रामीण भागात शेताच्या बांधावर किंवा ओसाड माळरानावर पावसाळी महिला वर्ग विविध भाजी, कंदमुळे लागवड करीत असतात. मात्र काहींना जागेचा अभावामुळे लागवड करु शकत नाही. यामुळे नाईलाजाने बाजारपेठ उपलब्ध होत असलेली भाजी खरेदी करावी लागते. मात्र, आपल्या जेवणात ताजी भाजी उपलब्ध व्हावी, या दृष्टीकोनातून खालापूर तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपटी आणि उसरोली या गावातील महिला वर्गांसाठी ‘माझी परसबाग’ ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मिरची, काकडी, वांग, दुधी, कारले आदींचे मिनी किट बियाणे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी महिला वर्गांचा मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला.
यावेळी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेंतर्गत कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रमात परसबागेतील भाजीपाला लागवड राबविण्यात आला. डी.बी. पाटील (कृषी उपसंचालक सांख्यिकी कृषी आयुक्तालय पुणे महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. लांडगे, तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय खोपोली, एम.एस.साळके, मंडळ कृषी अधिकारी खालापूर, आर.ए. आंधळे कृषी सहाय्यक, एन.व्ही. पाटील कृषी सहाय्यक, कृषी सहाय्यक सागर माने, शीतल डोखले, सी आर पी चिलठण, खंडू डोखले उपसरपंच चिलठण, सदर कार्यक्रमास बचत गटातील प्रमुख महिला जोशना विकास चोरगे, अंजना नामदेव पाटील, मीना महेंद्र गोळे व महिला बचत गटातील सदस्य उपस्थित होत्या.
घर सांभाळीत असताना भाजीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतो. रासायनिक भाजीपाल्यावर परसबागेतील भाजीपाला लागवड हा योग्य पर्याय आहे.
प्रज्ञा पाटील, बी.टी.एम.