टंचाईग्रस्त वाड्यांची तहान भागली


सद्भाव फाउंडेशनतर्फे पाण्याचे वाटप
। कर्जत । प्रतिनिधी ।
सद्भाव फाउंडेशन मुंबईतर्फे कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील पाणी टंचाई वाड्यांना मोफत पिण्याचे पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. सद्भाव फाउंडेशन समाजसेवी संस्था असून गेल्या चोवीस वर्षांत कर्जत व खालापूर मध्ये सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

संस्थेच्या माध्यमातून कर्जत व खालापूर तालुक्यातील एकूण 900 बचत गट स्थापन केले गेले आहेत, त्याचप्रमाणे त्यांना संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते, महिला सक्षमीकरण करणे त्याचप्रमाणे अगरबत्ती ट्रेनिंग, मसाले ट्रेनिंग, पापड बनविणे त्याचप्रमाणे बचत गटांना बँकेचे व्यवहार शिकवणे तसेच संस्थेमार्फत शेतकरी मंडळाची स्थापना देखील केली गेली आहे. संस्थेमध्ये 19 शेतकरी मंडळ आहेत. या सगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये प्रगती पाटील आणि प्रवीण पाटील मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून पाणीटंचाई गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये तालुक्यातील खानंद, कोठिंबे, पिंपळपाडा, जांभुळवाडी, बीड ठाकुरवाडी आदी गावांमध्ये सातत्याने आठ वर्ष पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्या कार्यक्रमास नीता दोशी, बिपिन भाई, व अरज लेट्स केअर संस्था व योगी डिवाईन सोसायटी यांच्या सहकार्याने सेवा पुरवली जाते. तसेच सद्भाव फाउंडेशन प्रकल्प अधिकारी सुनंदा लाड यांच्या नियोजनाखाली हे कार्यक्रम राबवले जातात.

Exit mobile version