| माथेरान | प्रतिनिधी |
दि सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्ट मुंबई यांनी 39 व्या वर्षात पदार्पण केले. याचे औचित्य साधून एक हात मदतीचा या उपक्रमांद्वारे दि सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्ट, मुंबई आणि लायन्स क्लब ऑफ गार्डन व्ह्यू मुंबई, श्री स्वामी नारायण मंदिर कल्याण व रोटी डे ग्रुप, कल्याण यांच्या सहकार्याने व ट्रस्टचे सेवानिवृत्त ट्रस्टी एस. जी. दिक्षित यांच्या संकल्पनेतून मध्य रेल्वेच्या काही स्टेशनला व्हीलचेअर वाटप केले. यात छ. शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल या स्टेशनला प्रत्येकी एक असे सहा व्हीलचेअर स्टेशन मास्टर यांना त्या स्टेशनचे सीटीआय व ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले.
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये लायन्स क्लब ऑफ गार्डन व्ह्यू, मुंबईचे लायन्स फिरोज कात्रक (District Governor), लायन्स पवन कुमार अग्रवाल (1st Vice District Governor), नितिन (रोटी डे ग्रुप, कल्याण), दिनेश ठक्कर (स्वामी नारायण हिल, कल्याण), रेल्वेचे मान्यवर अधिकारी प्रकाश कनोजिया (SRDCM -Works), चंद्रकांत पगारे, (स्टेशन डायरेक्टर CSMT), पंकज कुमार (ACM TC), प्रदीप कोरी (DCTI मुंबई), स्टेशन मॅनेजर CSMT व ट्रस्टचे अध्यक्ष डि.व्ही. चिंदरकर, सेक्रेटरी हरिश मोंडकर, खजिनदार गिरिश कदम, उपाध्यक्ष अभय कांबळे, ट्रस्टी शेखर तांबे, बाला पिल्लाई, आर एम बिरवटकर, प्रसाद करलकर, लीना गोरडे, सुचिता साळवी आणि कार्यशील सभासद सचिन सावंत, दिपक पापन उपस्थित होते.
मध्य रेल्वेच्या स्टेशनला व्हीलचेअरचे वाटप
