| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई शहर कबड्डी असो.च्या विद्यमाने 22 मार्चपासून भारतीय क्रीडा मंदिर-वडाळा येथे जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विशेष व्यावसायिक गट, व्यावसायिक-अ आणि ब गट, व्यावसायिक महिला, स्थानिक ब आणि क गटाचा समावेश असणार आहे. तरी ज्या संलग्न संघांना या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी आपले प्रवेश अर्ज सायं. 7 ते 8-30 या वेळेत सुट्टीचे दिवस वगळता दि. 17 मार्चपर्यंत संघटनेच्या कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन मुंबई शहर कबड्डी असो.चे सरकार्यवाह विश्वास मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.