जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक संपन्न

सेनाराष्ट्रवादी पॅनलचा दणदणीत विजय
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोकणातील सहकारी क्षेत्रांपैकी प्रमुख अशा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना नेते उदय सामंत आणि राष्ट्रवादी नेते तानाजीराव चोरगे यांच्या सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. तर या निवडणुकीमध्ये निलेश राणे पॅनलचा दारूण पराभव झाला आहे.
जिल्ह्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलने निवडणूक लढविली होती. त्यांना निलेश राणे यांच्या समर्थकांचे मोठे आव्हान होते. मात्र, उदय सामंत आणि चोरगे यांच्या पॅनलने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वर्चस्व निर्माण केले आहे.
या सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकूण 21 जागांपैकी 18 जागांवर उदय सामंत आणि तानाजी चौरगे समर्थकांचा दणदणीत विजय झाला, तर निलेश राणे यांच्या समर्थकांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
यामुळे कोकणातील आणखी एका प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांना दारूण पराभवाचे तोंड पहावे लागत आहे.

जिल्हानिहाय मतदारसंघातील 4पैकी 3 जागा सहकार पॅनेलने जिंकल्या. यात दिनेश मोहिते, संजय रेडीज, सुरेश कांबळे विजयी झाले. यापैकी एक जागा विरोधी गटाच्या अजित यशवंतराव यांनी जिंकली. रत्नागिरी, गुहागर आणि लांजा या 3 तालुका मतदारसंघापैकी लांजा येथे सहकार पॅनेलचा पराभव झाला. येथे विरोधी उमेदवार महेश खामकर विजयी झाले.

Exit mobile version