अलिबागमध्ये जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
क्रीडाभुवन, अलिबाग संस्थेतर्फे कै. विरेश प्रभू व कै. राजन ठोसर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा शुक्रवार दि. १८ फेब्रु. व १९ फेब्रु. २०२२ रोजी अलिबाग येथे घेण्यात येणार आहेत. सदर स्पर्धा २ गटात होणार असून या स्पर्धा दुहेरी पध्दतीने खेळविण्यात येतील. स्पर्धेची प्रवेश फी खुल्या गटातील दुहेरीसाठी रू. ६००/- असून ४० वर्षावरील प्रौढ गटातील दुहेरीसाठी रू.५००/- असेल. स्पर्धेतील विजेत्यांना रु.२५,०००/- ची भरघोस बक्षिसे व चषक देण्यात येणार आहेत.सदर स्पर्धा श्रीकांत डिस्ट्यूब्युटर्स यांच्या सहकार्याने घेण्यात येणार असून स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी आपली नावे श्री. हेमंत हजारे, मो. नं. ९८८१३९८८१३, श्री. नितीन जैन, मो. नं. ९३२५१२७४८३ यांचेकडे नोंदवावीत. खेळाडूंनी प्रवेश फी सह आपली नाव नोंदणी श्री. अशोक साष्टे, मो. नं. ९१५८५९४०९५ या नंबरवर गुगल पे ने करावी. नावे नोंदविण्याची अंतिम तारीख दि. १६ फेब्रु. २०२२ रोजी सायंकाळी ७.०० पर्यंत आहे.

Exit mobile version