। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा येथे बॅडमिंटन क्लबने जिल्हास्तरीय पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये अलिबागच्या अॅड.जुनेद घट्टे व प्रसाद सिद्दुसरे यांनी प्रथम क्रमांक ट्रॉॅफी व रोख 10 हजार रुपये तर रोह्याच्या अनिरुद्ध कराळे आणि वेद कुलकर्णी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यांना ट्रॉॅफी व रोख 5 हजार रुपये तसेच अलिबागच्या ओमकार मालपाणी व शुभम पाटील यांना तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना ट्रॉॅफी व 1 हजार रूपये असे बक्षीस देण्यात आले.
म्हसळा बॅडमिंटन क्लबतर्फे पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा म्हसळा तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पाली, पोलादपूर, महाड, माणगाव, गोरेगाव, रोहा, म्हसळा, दिवेआगर येथील एकूण 32 संघांनी स्पर्धत सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात अलिबागच्या अॅड.जुनेद घट्टे व प्रसाद सिद्दूसरे यांनी रोह्याच्या अनिरुद्ध कराळे व वेद कुलकर्णी यांच्यावर 21-14, 21-16, असा विजय मिळवून प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी म्हसळा बॅडमिंटन क्लबच्या मोहित मेहता, इमरान कादरी, समीर कादरी, असल कादरी, यांनी विशेष परिश्रम घेतले.