| उरण | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन व ओम साई कॅरम क्लब उरण यांच्या सहयोगाने द्रोणागिरी देवी मंदिर सभागृह करंजा उरण येथे 1 व 2 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 112 स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी केले. स्पर्धेसाठी दोन दिवस जेवणाची व्यवस्था केली होती. सदर स्पर्धेस उरणच्या नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी भेट दिली. स्पर्धेत प्रथम क्रमांक मानव पटेल कामोठे, द्वितीय क्रमांक आशिष देशमाने पनवेल, तृतीय क्रमांक अश्रफ खान पनवेल व चतुर्थ क्रमांक राजेश गोहिल कामोठे यांनी मिळवला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी वैभव वाईगडे, वैभव पेठे, अमित यादव, विराज नाखवा आदी सभासदांनी प्रयत्न केले.







