। पाली/बेणसे । वार्ताहर ।
मागील 4-5 वर्षापासून जागतिक हवामान बदलाचा फटका आंबा,भाजीपाला, फळे, कडधान्ये व सर्व प्रकारच्या फलोत्पादनाला बसला आहे. परिणामी शेतकर्यांचे उत्पादन घटून ते 40 टक्क्यावर आहे.याचा फटका कोकणातील व रायगड जल्ह्यातील आंबा खास करून हापूस आंबा उत्पाद्काना बसला आहे . तसेच येथील नगदी उत्पन मिलवनारी तोंडली भाजी, अलीबाग तालुक्यात कार्लेखिंड ते वाडगाव पर्यंतच्या सागाव, तळवली,कार्ले, नेहुली, खंडाळे, पवेळे या व आजूबाजुच्या परिसरात पारंपरिक पद्धतीने सफेद कांदा पिकवणारे शेतकरी उत्पादन घटल्यामुळे आर्थिक अडचणीत आले आहेत .
शेतकरी वर्गासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने 20 मार्च रोजी श्री समर्थ कृपा वृद्धाश्रम परहूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केले आहे. मेळाव्यात आंबा भाजीपाला पिकावरील रोगांच्या प्रादुर्भाव व प्रभावी उपाययोजना,रसायनमुक्त कृषी फलोत्पादन, शेतकर्यांसाठी असलेल्या राज्य व केंद्र शासनाच्या योजना, वकिल ते पकिल यावर तसेच निर्यात संबंधी मार्गदर्शन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहाय्याने शेतक यांना उपकृत करणे,क्सीस बँकेंच्या कर्ज वितरणानासंबधी योजना आदी विषयांवर तज्ञाचे मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमास एस .आर.पाटील,दत्तात्रेय काळभोर, डॉ.एस.बी.भगत, सतीश बोराडे, ज.आर.मुरकुटे, गोविंद हांडे, सुनील चौधरी आदी मान्यवर उपस्थीत राहणार आहेत. 20 मार्च रोजी दुपारी 2.00 वाजता परहुर अलिबाग येथे जिल्हास्तरीय मेळाव्यास जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रकांत मोकल यांनी केले आहे.