| पाली/गोमाशी | वार्ताहर |
रायगड जिल्हा क्रीडा परिषद अलिबाग यांच्या वतीने 2023-24 या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन ग.बा. वडेर हायस्कूल व व.ग. ओसवाल ज्युनिअर कॉलेज, पाली येथे 12 व 13 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.
या स्पर्धेत जिल्ह्यातील मुली व मुलाच्या 90 कबड्डी संघाने सहभाग घेतला होता. मुलींच्या 14 वर्षीय वयोगटात प्रथम कर्जत, द्वितीय सुधागड, 17 वर्षे वयोगटात प्रथम माणगाव, द्वितीय अलिबाग, 19 वर्षे वयोगटात प्रथम अलिबाग, द्वितीय सुधागड तर मुलांच्या कबड्डी स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात प्रथम महाड, द्वितीय खालापूर, 17 वर्षी वयोगटात प्रथम सुधागड, द्वितीय अलिबाग, 19 वर्षे वयोगटात प्रथम अलिबाग, द्वितीय मुरुड या संघानी पारितोषिके पटकावली.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे गीता पारलेचा, रवींद्र लिमये, रविकांत घोसाळकर, मुख्याध्यापक घोडके, गटशिक्षण अधिकारी साधुराम बांगारे, क्रीडा कार्यालय अधिकारी वांजळे आदी मान्यवर उपस्थित होते.