नागावमध्ये जिल्हास्तरीय खुला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन

। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व रणसंग्राम क्रिडा मंडळ, नागावच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.5) जिल्हास्तरीय खुला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 15 हजार रुपये व भव्य चषक, द्वितीय क्रमांकासाठी 11 हजार रुपये व भव्य चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी 7 हजार रुपये व भव्य चषक असे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तसेच वैयक्तिक पारितोषिंकांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूला फ्रिज व चषक, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पक्कड करणार्‍या खेळाडूला कूलर व चषक तर पब्लिक हीरो ठरणार्‍या खेळाडूला मनगटी घड्याळ व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी रोहित राणे 9881072123 व शुभम नाईक 8806050377 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन रणसंग्राम क्रिडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version