| कोर्लई| वार्ताहर|
मुरूडच्या सर एस. ए.हायस्कूल व स्व. म.ल.दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश मिळवून महाविद्यालयाच्या कब्बडी संघाची जिल्हा पातळीवर निवड झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. सर एस. ए.हायस्कूल व स्व. म.ल.दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून जिल्हा पातळीवर आपला प्रवेश निश्चित केला होता.पाली येथे नुकत्याच दि. 12व 13 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या कबड्डी स्पर्धेत मुलांच्या संघाने दमदार कामगिरी करून जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवला तसेच या संघातील जितेंद्र ढेबे व मंथन दिवेकर हे दोन खेळाडू विभागीय संघासाठी पात्र आहेत या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक तोंडले सर, पालशेतकर सर यांचे मार्गदर्शन लाभले विजयी संघाचे प्रशिक्षकांचे जंजिरा विद्या मंडळाचे अध्यक्ष सुधाकर दांडेकर, शाळेचे मुख्याध्यापक सरोज राणे , पर्यवेक्षक गावडे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.