जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धा; गौरकामत संघ विजयी

| नेरळ । वार्ताहर ।
तालुक्यातील बेकरेवाडी येथील आमदार चषक जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील 64 संघांचा सहभाग असलेल्या या कबड्डी स्पर्धेचे अंतिम सामन्यात गौरकामत संघाने काल्याच्यावाडी येथील संघाचा पराभव करून पटकावले. तालुक्यातील माणगावतर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायतमधील बेकरेवाडी येथे जिल्हास्तरीय आमदार कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच कल्याणी कराळे यांचे हस्ते झाले.

त्यावेळी कल्पना पारधी, सांरग कराळे, जैतु पारधी, गणेश पारधी, नितीन पारधी, बुधाजी पारधी, हरेश पारधी, मंगेश निरगुडे, चंद्रकांत चौधरी, अंकुश दाभणे, अंकुश शेळके, मिलिंद विरले, प्रसाद थोरवे, केतन पोतदार, जयवंत साळुंके, किशोर घारे, विलास डबरे उपस्थिती होती. आदिवासी कबड्डी असोसिएशनचे आदीवासी क्रीडा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन वारघडे, जयराम उघडा, नितीन निरगुडा, रमेश बांगारी, महेश शेंडे, असोसिएशन पदाधिकारी आणि पंच यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा राबविली गेली.

या स्पर्धेत काळ्याचीवाडी हा संघ उपविजेता ठरला. तिसर्‍या क्रमांकावर भुतीवली तर चौथा क्रमांक टपालवाडी संघाने संघाने पटकावला.पाचवा क्रमांक माणगाव आणि सहावा क्रमांक पळसदरी संघाने मिळविला.या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार गौर कामत संघाच्या राजा पवार याने पटकावला.स्पर्धेत उत्कृष्ट रायडर म्हणून महेश पारधी, भूतीवलीवाडी तसेच उत्कृष्ट रायडर करण टपालवाडी, तर शिस्तबद्ध संघ-बोरीचीवाडी भिवपुरी आणि उत्कृष्ट गणवेशसाठी कवेलावाडी संघाला सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version