जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुहास माने हकालपट्टी करा



शिवराज्य ब्रिगेड संघटनेची मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मनमानी कारभार करीत सर्व जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेचे तिन तेरा करणार्‍या जिल्हा रुगणालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांची पदावरुन हकालपट्टी करुन रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार धरुन गुन्हा दाखल करुन त्यांची सविस्तर चौकशी करण्याची मागणी शिवराज्य ब्रिगेड संघटनेचा जिल्हा अध्यक्ष जगदिश घरत यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य संचालक तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे.

याबाबतच्या दिलेल्या निवेदनानुसार जगदिश घरत यांनी डॉ सुहास माने यांचे पितळ चांगलेच उघड पाडले आहे. जिल्हा रूग्णालयाचे शल्यचिकीत्सक डॉ सुहास माने यांनी रायगड जिल्हा रूग्णालयाची धुरा हातात घेतल्या पासुन कोरोना काळामध्ये अनेक कृत्ये अशी केली आहेत की त्यामुळे सर्व सामान्य जनतेला त्यांचा अतोनात त्रास झालेला आहे. जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे यापूर्वी ही अनेक तक्रारी झालेल्या आहेत परंतु त्याची आजपर्यंत दखल जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत घेतलेली दिसत नाही. अन्यथा रायगड जिल्हा रूग्णालयामध्ये डॉ. सुहास माने दिसले नसते. कोरोना काळामध्ये शासकीय रूग्णालयातून सर्वसामान्य जनतेला विनामूल्य रूग्णवाहिका सेवा देण्यात येत होती व आहे परंतू डॉ. माने यांचे आद्य कर्तव्य असून सुध्दा सर्वसामान्य जनतेला शासकीय रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास त्यांचा हलगर्जीपणा नेहमीच चव्हाटयावर आलेला आहे त्यामुळे रूग्णांना खाजगी रूग्णवाहिका भाडयाने करण्यास भाग पडले परिणामी तो अतोनात खर्च कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला त्रासदायक ठरला याला जाबाबदार हे सिव्हिल सर्जन डॉ. मानेच आहेत. शासकीय कर्मचारी सुट्टीवर जातात म्हणून कंत्राटी कामगारांची अडवणूक आणि छळवणूक ही डॉ. माने यांच्या मार्फत झालेली आहे. याबाबत ओम साई सेवा संस्था कर्जत यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तकार सुद्धा दाखल आहे. पण सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवून कार्य करण्यार्‍या डॉ. माने यांना शासकीय पातळीवर अभयच मिळते याबाबत सविस्तर चौकशी करण्यात यावी.

स्वत:च्या पदाचा गैरवापर करून, पदनियुक्त्या करणे ज्या वैद्यकीय सहकारी अधिकार्‍यांची ज्या ठिकाणी गरज आहे तिथे त्याला न ठेवता इतर काम करण्यास भाग पाडणे ही सुध्दा कृत्ये यांचीच आहेत. शासनाने लाखो रूपये खर्च करून रूग्णांया विम्यासाठी जी कंपनी नियुक्त केली होती तिला कोणतेही सहकारी डॉ.माने यांच्यामार्फत झालेले नाही. अनेक रूग्णांच्या नातेवाईकांनी व्हीडीओ बनवून डॉ. माने बद्दल सोशल मिडीयावर, वृत्तपत्रामध्ये, ठिकठिकाणी डॉ. माने यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केलेले आहे. हे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुध्दा पोचलेले आहे. परंतु यांची दखल आजपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आजपर्यंत का घेतली गेली नाही हा मोठा प्रश्‍नच आहे. रूग्णांच्या नातेवाईकांचे फोन न उचलणे, ज्या पदावर डॉ. माने कार्यरत आहेत त्याची जबाबदारी झटकणे, हॉस्पीटल मध्ये उपलब्ध नसणे आणि ते कोणालाही माहित नसणे इतका अनागोंदी कारभार डॉ. माने यांचा सुरू आहे. कोरोना काळामध्ये रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉ. माने यांच्या कारभाराबद्दल जे व्हीडीओ सोशल मिडीयावर प्रसिध्द केलेले आहेत. त्यामध्ये डॉ. माने यांच्या हलगर्जी कारभारामुळेच पेशंट दगावलेले आहेत. असा 50 % पेक्षा जास्त लोकांचा आरोप आहे.

वरील सर्व माहिती ही संक्षिप्त स्वरूपातच आहे. तसे पाहिले तर डॉ. माने यांचे भ्रष्टाचाराचे, लाच घेतल्याचे, अनागोंदी कारभार, त्यांच्या पदाचा गैरवापर असे आरोप त्यांच्यावर आहेत. त्यामुळे सर्वात जास्त म्हणजेच डॉ. माने यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या हुकूमशाही कारभारामुळे अनेक रूग्णांना त्यांचे प्राण कोरोना काळात गमवावे लागले आहेत. जगदिश घरत यांनी आपल्या संघटनेच्या वतीने शासनाकडे मागणी केली आहे की कोरोना काळामध्ये दगावलेल्या सर्व रूग्णांची आकडेवारी मागवून त्यांची चौकशी करण्यात यावी. आणि सर्वच स्तरातून भ्रष्टाचार, मनमानी कारभार, हलगर्जीपणा, पदाचा दुरूपयोग, बेताल वागणे आणि अनेक लोकांच्या मृत्यूस स्वत:च्या हलगर्जीपणामुळे जबाबदार हे फक्त डॉ. माने हेच असा आरोपही जगदिश घरत यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब सेवेतुन बडकर्फ करावे आणि दुसर्‍या कुठल्याही जिल्हयात याच पदावर बदली न करता हाच कारभार इतरत्र होऊन सर्वसामान्य जनता पुन्हा डॉ. माने यांच्या त्रासाला बळी पडू नये म्हणून त्यांचा खातेबदल करावा, असे आदेश पारीत करावेत अशी मागणीही घरत यांनी केली आहे.

Exit mobile version