जिल्हा किशोरगट खो- खो चाचणी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनतर्फे 27 वी किशोर- किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धा रविवारी (दि. 9) नोव्हेंबर रोजी कामोठे, तालुका-पनवेल येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे, तालुका पनवेल येथे ही स्पर्धा होणार आहे. यातून जिल्ह्याचे किशोरगट (14 वर्षांखालील) मुले व मुलींचा संघ निवडण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर आहे. अधिक माहितीसाठी विशाल शिंदे, रोहा 9975242588, राकेश म्हात्रे, अलिबाग 8087463881 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रायगड जिेल्हा खो-खो असोसिएशनचे कार्यवाह आशिष पाटील यांनी केले आहेे.

Exit mobile version