| रायगड | जिल्हा प्रतिनिधी ।
माणिक सावंत, नंदकुमार सावंत, प्रिया सावंत, वंदना सावंत, राजाराम सावंत यांच्या स्मरणार्थ दिवाडकर नृत्यकला पथकाचे आयोजन नागावमध्ये करण्यात आले आहे. बाळाराम सावंत यांच्या सौजन्याने सावंत परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. नागावमधील कोठारभाट येथील बाळाराम सावंत यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम मंगळवारी (दि.22) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास होणार असल्याची माहिती सावंत परिवाराकडून देण्यात आली आहे. श्रीनाथ अपराध, जितेश अपराध, सुशील नाक्ती यांच्याकडून या कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओवी बनकर, अनवी साळवी, श्लोक तळेकर, अथश्री साळवी यांनी केले आहे.
नागावमध्ये दिवाडकर नृत्यकलेचे आयोजन
