दिव्या खडपे कोरोनायोद्ध्याने सन्मानित

अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनकडून गौरव
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर असोसिएशन संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाकाळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल चौल सागमळा येथील दिव्या खडपे हिच्यासह प्रज्ञा माळी आणि समीक्षा घरत यांना कोव्हिडयोद्धा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

हा सोहळा रविवारी अलिबागमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाला.या कार्यक्रमास आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन राऊळ, रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष विवेक सुभेकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनावडेकर, हरी देशमुख, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष अभिजित पाटील, अश्‍विनी टीचर्स क्लासेसच्या संचालिका अश्‍विनी मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर मालोदे, रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनचे खजिनदार जितेंद्र मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे सचिव अमोल नाईक यांनी केले.

Exit mobile version