| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिवाळीच्या उत्सवादरम्यान फटाके आणि शॉर्टसर्किटमुळे देशभरात आगीच्या अनेक दुर्घटना घडल्या. या घटनांमध्ये 23 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. मध्य प्रदेशात सर्वाधिक 13, तर महाराष्ट्रात 6 जणांना जीव गमवावा लागला.
मध्य प्रदेशातील कटनी येथे एकाच कुटुंबातील सहा जणांचा, तर सिवनी येथेही सहा जणांचा आगीत मृत्यू झाला. उज्जैनमध्ये 107 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील धाराशिव येथे एकाच कुटुंबातील सहा जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. पुण्यात एका रात्रीत आगीच्या सुमारे 63 घटना घडल्या. मुंबईतील लोखंडवाला येथे एकाचा मृत्यू झाला. राजस्थानमधील पाली येथे फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला, तर दिल्लीत फटाक्याचा रॉकेट लागून दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. अन्य राज्यांतही आगीच्या दुर्घटनांमध्ये मोठे नुकसान झाले.
दिवाळीत आगीचे तांडव; देशभरात 23 जणांचा मृत्यू
