आदिवासी बांधवांना दिवाळी भेट

| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |

अहिंसा संघ संचलित भायखळा महावीर प्रसादम, सुकृत ग्रुपतर्फे पोटलज बुद्रुक येथे डुबेवाडी, आसनेवाडी येथील 600 आदिवासी बांधवांना दिवाळीनिमित्त शनिवार, दि. 18 रोजी साहित्य भेट देण्यात आले.

सुकृत ग्रुपच्यावतीने 450 आदिवासी बांधवांना, पोटलज बुद्रुक येथील 100 बांधवांना प्रत्येकी ब्लँकेट, ताट, वाटी, चमचा, ग्लास, बुंदी तर 150 विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप करण्यात आले. उपस्थित बांधवांना 100 डझन केळी, तर विद्यार्थ्यांना चॉकलेट देण्यात आली. हे साहित्य भूमीपुत्र दिलीप धनावडे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाले. हे साहित्य स्वीकारताना अधिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सुकृत ग्रुपच्या मंडळींना खूप समाधान वाटले. यावेळी या कार्यक्रमासाठी संजय लोढा, शमाबेन लोढा, ऋद्धि लोढा, द्रुती लोढा, उषा लोढा, कुमारपाल जैन, चिराग कोटारी, पर्व कोटारी, सुरेश जैन, कलावती जैन, स्वेता जैन, दिया जैन, क्रिशा जैन, सुधीर धनावडे, अंकुश धनावडे, चंद्रकांत धनावडे, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सतीश हुले यांनी मानले.

Exit mobile version