। उरण । वार्ताहर ।
दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. उरण मध्ये अनेक ठिकाणी दिवाळी निमित्त संगीताचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. यंदा दिवाळी सणाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष उरण तालुका तर्फे उरण तालुका चिटणीस विकास चंद्रकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि 24 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी ६ : १५ वा. मल्टीपर्पज हॉल, जेएनपीटी टाउनशिप, उरण येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिक प्रेषकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
दिवाळी पहाट कार्यक्रमात गायक गणेश घरत, लीना अभ्यंकर यांचे सुरेल असे गायन झाले. त्यांना पखवाज-क्रिश ठाकूर, तबला जयदास ठाकूर, हार्मोनियम – मिलिंद म्हात्रे, टाळ – प्रकाश जोशी यांची साथ लाभली. सदर दिवाळी पहाट कार्यक्रमाचे उदघाटन जेएनपीटीचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, उरण पंचायत समितीचे माजी सभापती महादेव बंडा, महिला तालुकाध्यक्ष सीमा घरत यांच्या हस्ते झाले. अतिशय सुंदर असे गायन व वादन झाल्याने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी उपस्थित सर्वांनी गायन वादन करणारे कलाकार व आयोजक शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस विकास नाईक यांचे कौतुक केले.
यावेळी रायगड भूषण एल बी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, माजी पंचायत सभापती सागर कडू, माजी सभापती नरेश घरत, युवा नेते निलेश म्हात्रे, सरचिटणीस यशवंत ठाकूर, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, कामगार नेते गणेश घरत, माजी उपनगराध्यक्ष नहीदा ठाकूर, महालन विभाग उपाध्यक्ष रेखा घरत, जिल्हा उपाध्यक्ष सुप्रिया म्हात्रे, तालुका युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, विधानसभा अध्यक्ष रमाकांत पाटील, पागोटेचे माजी सरपंच भार्गव पाटील, ग्रामपंचायत सदस्य किरण घरत, कार्यकर्ते हिरामण पाटील आदी मान्यवर तसेच शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीत शेतकरी कामगार पक्ष आयोजित दिवाळी पहाट हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत मोकल यांनी केले.