युवाशक्ती प्रतिष्ठानतर्फे ‘दिवाळी संध्या’

| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील घसवड येथे दीपावलीच्या शुभमुहूर्तावर युवा प्रतिष्ठानच्या वतीने ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 5 नोव्हेंबर रोजी संध्या. 4 वाजता दिवाळी पाडवानिमित्त घसवड गावात ‘दिवाळी संध्या’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमावेळी गावचे अध्यक्ष घनश्याम भगत, शिवाजी टेंगळे, युवाशक्ती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेंद्र पाटील, कार्यकारी सचिव हितेश वाघमारे व इतर तसेच लहान मुले, महिला, पुरूष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वेजल पाटील व साक्षी वाघमारे या शाळकरी मुलींनी केले.

Exit mobile version