ग्रामीण पतसंस्थेची दिवाळी होणार गोड!

| माणगाव | प्रतिनिधी |

सहकार क्षेत्रात रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्थांपैकी एक ओळखल्या जाणाऱ्या माणगाव शहरातील नामांकित माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित उतेखोल तालुका माणगाव या पतसंस्थेचे 2022-23 हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या पतसंस्थेच्या सभासदांची दिवाळी यंदा गोड होणार असून सभासदांना भेटवस्तू देण्याचा मानस संस्थेतर्फे करण्यात आल्याचे संस्थेचे कार्यतत्पर चेअरमन आनंद यादव व सर्व संचालक यांनी सांगितले.

माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था हि माणगावमधील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून संबंध रायगड जिल्ह्यात ओळखली जाते. या संस्थेची स्थापना 17 डिसेंबर 1998 रोजी करण्यात आली असून पतसंस्थेचे हे 26 वे रौप्य महोत्सवी वर्ष सुरु आहे. पतसंस्थचे कार्यतत्पर चेअरमन आनंद यादव व सह्कारी सर्व संचालक मंडळाने यावर्षीही पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षीहि संस्थेच्या सर्व सभासदांना दिवाळी निमित्त भेटवस्तू देण्याचे ठरविले असल्याने यावर्षीहि संस्थेच्या सभासदांची दिवाळी गोड होणार आहे. तरी, याबाबत पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी संस्था कार्यालय चौधरी कॉम्प्लेक्स निजामपूर रोड माणगाव याठिकाणी 8 नोव्हेंबर पर्यंत समक्ष भेट देऊन आपले कुपन घेऊन आपली भेटवस्तू स्वीकारावी, असे आवाहन पतसंस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version