। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्यातील नावाजलेल्या व सर्वसामान्यांची पतसंस्था अशी ओळख असलेल्या श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, नागोठणे या पतसंस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील इंद्रप्रस्थ हॉटेलच्या सभागृहात शुक्रवार (दि.23) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेच्या सचिव आरती रोहिदास हातनोलकर यांनी दिली आहे.
पतसंस्थेचे सभापती विलास चौलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला शासकीय प्रमाणित लेखापरिक्षक दिनेश कोळी, नागोठणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजन जगताप, शरद वाडेकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने पतसंस्थेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नागोठणे शहर व विभागातील व्यक्तींंचा सत्कार करण्यात येणार आहे.