| माणगाव | वार्ताहर |
सिमला-टिम जेनिथद्वारे सिमला-हिमाचल प्रदेश कोटी रिसॉर्ट येथे मॉडेल मिस इंडिया 2022 चे आयोजन सोमवार (दि.19) सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. सदर स्पर्धेत माणगाव तालुक्यातील प्रणाली खांबे ही आयएसओ प्रमाणित द फेम मिस इंडिया 2022 ची विजेती ठरून तिने हा किताब पटकाविला. तिला हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्पर्धेचे आयोजक मिथिल कळंबे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.