| अलिबाग | प्रतिनिधी |
श्रीसेवाशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. चोरोंडेच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे श्रीसेवाशक्ती पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार 2022 देऊन गौरविण्यात आले.
श्रीसेवाशक्ती ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थेचे अध्यक्ष सीताराम कवळे, संचालक सुनील थळे, नितीन अधिकारी यांनी दीपस्तंभ पुरस्कार 202 पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच गणपतीपुळे येथील ग्रीन लीप रिसॉर्टच्या सभागृहात झाली. या सभेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कार्याध्यक्ष राजूदास जाधव, महासचिव डॉ. शांतीलाल सिंगी, खजिनदार दादाराव तुपकर, संचालक सुरेश पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेत सामंत यांच्या हस्ते दीपस्तंभ पुरस्कार 2022 चे वितरण करण्यात आले.
उत्कृष्ट काम करणार्या राज्यातील पतसंस्थांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे दीपस्तंभ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कोकण, औरंगाबाद, नाशिक, नागपुर, अमरावती, पुणे या विभागातून दीपस्तंभ पुरस्कारासाठी पतसंस्थांची निवड केली जाते. कोकण विभागात श्रीसेवाशक्ती पतसंस्थेचा उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.