कर्जत रोटरीतर्फे आदिवासींसोबत दिवाळी

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत रोटरी क्लब च्या माध्यमातून यावर्षीची दिवाळी तालुक्यातील आदिवासींसमवेत साजरी करण्यात आली. यासाठी हालिवली आदिवासी वाडी,किरवली,सावरगाव आणि इतर आदिवासी वाड्यांमध्ये प्रत्येक्षात जाऊन तेथील प्रत्येक कुटुंबातील बांधवांपर्यंत हा दिवाळीचा आनंद वाटप करण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर शहरातील रिमांडहोम, शासकीय महिला वसतिगृह ,नेरळ येथील मुलींचे आसरा सुरक्षा शेल्टर येथील निराधार मुले,महिला व मुली यांनाही मिठाई वाटप करण्यात आली. त्यावेळी निवासी नायब तहसीलदार विजय राऊत,नायब तहसीलदार सोपान बचाकर उपस्थित होते.

तर रोटरी क्लब चे अध्यक्ष श्रीखंडे सचिव विशाल शाह,तसेच रोटेरियन जितेंद्र ओसवाल,योगेश राठी,हुसेन जमाली,अरविंद जैन,डॉ आदित्य जंगम,सुजित भोईर,आदींसह आदिवासी ग्रामस्थ सुनील पवार,अनंत सांबरी,यांचा सहभाग होता. दिवाळी सणानिमित्ताने दिवाळीच्या पहिल्या दिवसा पासून आजूबाजूच्या डोंगर भागातील काही आदिवासी वाडयांमध्ये जाऊन तेथील सर्व कुटुंबाना फराळ,लाडू ,महिलांसाठी साड्या,सुगंधी उठणे,मुलांना फुलबाजे ई..वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version