नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोनाच्या लसीकरणाआधी पेनकिलर घेऊ नका असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. यामुळे लसीचा विपरीत परिणाम होऊ शकतात असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. लसीकरणानंतर जाणवणार्या वेदना दूर करण्यासाठी पेनकिलर्स घेतल्यास हरकत नाही असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. सोशल नेटवर्किंगवर कोरोना लसीकरणाच्या साईड इफेक्टसंदर्भात अनेक खोट्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आलं आह.
कोरोना लसीकरणासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने अजून एक मोठा इशारा दिला आहे. कोरोनाची लस घेण्याअगोदर कोणत्याही प्रकारची पेनकिलर न घेण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. कोरोना लस घेतल्यानंतर कोणतेही साईड इफेक्ट होऊ नये यासाठी लसीअगोदर पेनकिलर घेतल्याचं समोर आल्यावर जागतिक आरोग्य संघटनेकडून हे सांगण्यात आलंय.
दरम्यान यावेळी लस घेतल्यानंतर पेनकिलर घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून परवानगी देण्यात आली आहे. थकज च्या म्हणण्याप्रमाणे, लसीकरणानंतर जाणवणार्या वेदना दूर करण्यासाठी घेतल्यास हरकत नाही. लस घेण्याआधीच पेनकिलर्स घेतल्यास त्याचा विपरित परिणाम लसीच्या प्रभावावर होऊ शकतो.
लस घेतल्यानंतर त्याचे सौम्य साईड इफेक्ट्स दिसून येतात. यामध्ये अंगदुखी, डोकेदुखी तसंच ताप असे इफेक्ट दिसून आले आहेत. त्यामुळे या परिणामांवर उपचार करण्यासाठी पेनकिलर किंवा पॅरासिटेमॉलचा वापर केला जाऊ शकतो, असं थकजने स्पष्ट केलं आहे.
कोरोना लसीकरणानंतर दिसून येणार्या दुष्परिणामांबाबत सोशल नेटवर्किंगवर काही चुकीच्या पोस्ट व्हायरल झाल्या. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कोरोना लसीचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी लस घेण्याआधी पेनकिलर्सचा वापर केल्याने फायदा होतो असा दावा या पोस्टमध्ये केल्या असून हा दावा खोट्या असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या स्पष्टीकरणानंतर स्पष्ट झालंय.
कोणत्याही गोळ्यांचं आधी सेवन केल्याने हे साईड इफेक्ट टाळता येत नाहीत. त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवरील व्हायरल पोस्टवर विश्वास ठेऊन पेनकिलर्स खाऊन लसीकरणास जाणं हे धोक्याचं ठरु शकतं. लसीवर या गोळ्यांमधील रसायनांचा कसा परिणाम होतो यासंदर्भातील माहिती अद्याप संशोधनामधून उघड झालेली नसली तरी त्याचा परिणाम लसी किती परिणाम करेल यावर होण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे.