तुम्हाला ‘या’ रानभाज्यांचे आयुर्वेदिक महत्व माहित आहे का?

आयुर्वेदिक गुणधर्म मिळणार्‍या भाज्यांचे सेवन करा
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुका डोंगर रांगा आणि नदीनाले यांनी बनला आहे. त्यात डोंगर दर्‍यांमुळे मोठ्या प्रमाणात रानभाज्या कर्जतच्या जंगल भागात आढळून येत असतात. तालुक्यातील जंगलात पावसाळ्यात सहज आढळून येणार्‍या रानभाज्यांना आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्व आहे. दरम्यान, कोरोनाच्या कालखंडानंतरही वाढती मागणी असल्याचे दिसून येत आहे.

सध्याच्या सेंद्रिय खाते यापासून पिकवलेल्या भाजीपाला यांना मोठी मागणी आहे. त्यात जंगली रानभाज्या यादेखील ग्राहकांच्या पसंतीच्या असल्याने जंगली रानभाज्या या सेंद्रिय खाते यांची मात्रा लाभलेल्या भाज्या समजल्या जातात. रानमेवा म्हणजे खर्‍या अर्थाने कोणतही खत किंवा कीटकनाशक नाही, हेच काय कोणतीही लागवड नाही. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाषा म्हणजे पावसात पर्वणीच असते.

या रानभाज्या कर्जत, मुरबाड, वसई, पालघर, सफाळे या ठिकाणच्या जंगलात आढळतात. या भागातील आदिवासी मुंबई, ठाण्यासारख्या भागात विक्रीसाठी घेऊन जातात. स्थानिक आदिवासी जवळच्या बाजारपेठेत, तर कर्जत तालुक्यातील आदिवासी कर्जत, कशेळे येथील बाजारपेठेत ह्या भाज्या विक्रीसाठी आणत आहेत. त्यापैकी कर्जत तालुक्यातील जंगलात मुबलक प्रमाणात ग्रामीण भागात चवीने खाल्ल्या जातात. कोरोनाचा प्रादुर्भाव आता खेड्यापाड्यात पोहोचला आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. अशातच रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधे यांसह आरोग्यवर्धक असलेल्या रानभाज्यांची मागणीही वाढत आहे.

कुलुची भाजी
पावसाळ्याच्या अगदी पहिल्या सरीनंतर कुसूची भाजी रानोमाळ दिसू लागते. अगदी काही दिवसातच ही भाजी तयार होत असल्याने बाजारात सर्वात आधी याच भाजीचं आगमन होतं.

कंटोली
कंटोली एक फळभाजी असून, ती पावसाळ्यात कमीत कमी 15 दिवसांत पूर्ण उगवते. ही भाजी कारल्यासारखी दिसते आणि कडूसुद्धा असते. कारल्याची भाजी करतात तशीच या फळाची भाजी केली जाते.

कंटोली

दिंडा
दाभा संपला की मृत अवस्थेत जाते आणि पावसाळ्याच्या पहिल्या सरीबरोबर त्याला कॉब फुटू लागतात. पूर्ण वाद होण्याआधीच तिची कॉम ले जातात. दिहाची भाजी खास प्रसिद्ध आहे. ही भाजी उगवल्यानंतर कोवळी असतानाच तोडी जाते. भारंगच्या पानांच्या कडा करवतीसारख्या मुंबईच्या बाजारात मेथीच्या जुदी सारखी ही भाजी घेता येते.

कुरड
हे एक प्रकारचं तण असतं. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रानोमाळ कुर जातीची पालेभाजी दिसु लागते. कुर पालेभाजीच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.

कळ्याची भाजी
रोगप्रतिकार शक्ती वाढवणार्‍या ’रानभाज्याना वाढती मागणी,कळ्याची भावी दिसायला मेथीच्या भाजी असते.रानोमाळी टाकल्याची भाजी बरोबर पसरलेली आपण आपल्या आजूबाजूला दिसू शकते.

रानभाज्यांचे औषधी गुणधर्म
आघाडा, माळा, कई, मोरंगी, कंटोळी, काटेसावर, नारई, बागोटी, टाकळा, आंबाडी, भोकर, खडकतेरी, भोवरी यासारख्या भाज्यांमध्ये जस्त (झिंक), तांबे, कैल्शियम याचे प्रमाण अधिक असते. रानकेळी हा खोकल्यावर रामबाण उपाय आहे. भारंगीची भाजी ही नवीन फुटलेल्या कोबाच्या व पानाच्या स्वरूपात असते. यात प्रोटीन्सही भरपूर असतात. टाकळ्याची भाजी ही मेथीच्या भाजीसारखी असते. टाळक्याच्या पानांचा लेप विविध त्वचाविकारांवर लावतात. दातांसारख्या असतात. भारंगाची सुकी भाजी विशेष लोकप्रिय आहे. याशिवाय याची फुले, शेंगा, चावल, मोहोदोडे, टेलपात, माठ, शेवली, लोत, नाजीलकंद अ गावठी सुरण, पेंटर, काठ माठ, कवळा, रानतेरा, शेकटाचा पाला, रानकेळी, आंबट-मूली, रानकारली इत्यादी या सर्व भाज्या करण्यासाठी अगदी सोप्या आणि खायला रुचकर असतात व नैसर्गिकपणे उगवल्याने आरोग्यासही चांगल्या असतात.

Exit mobile version