गोदी कामगारांना घरे मिळाली पाहिजेत – वाबळ

| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई शहरात मुंबई पोर्ट हे लँड लॉर्ड पोर्ट असून, पोर्टमधील या जमिनीचा विकास करताना गोदी कामगारांना आपल्या हक्काची घरे मिळाली पाहिजेत, असे स्पष्ट उद्गार मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी प्रकाशन सोहळ्यात काढले.मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने बॅलार्ड पिअर येथील मुंबई पोर्टच्या विजयदीप कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक 2022 चे प्रकाशन नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते झाले.

सेक्रेटरी मोहन राजू , अ‍ॅड.एस. के. शेट्ये,जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज ,दत्ता खेसे , अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्‍वासराव आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी युनियनचे पदाधिकारी विद्याधर राणे, विजय रणदिवे, विकास नलावडे, निसार युनूस, शीला भगत, शशिकांत बनसोडे, मनिष पाटील, संदीप चेरफळे, विष्णू पोळ, पुंडलिक तारी,अब्दुल गणी सारंग, जे.आर. भोसले, विठोबा पवार, खानोलकर, आर. एन. शेख, ट्राफिक शेनगर, अनंत दाभोळकर, नारायण गव्हाणे, विवेक तवटे, प्रकाश पोळ, विलास देवळेकर, प्रवीण मंत्री, प्रदीप गोलतकर, उत्तम भोर, मिलिंद आरोलकर, शशिकांत सावंत, दत्ताराम दळवी, रवींद्र जाधव, उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन सतीश घाडी यांनी केले तर आभार मनिष पाटील यांनी मानले.

Exit mobile version