मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी, पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी विशेषांकाचे सहसंपादक, मुंबई पोर्ट ट्रस्टचे लीगल असिस्टंट विजय रणदिवे हे 31 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होणार आहेत. त्यानिमित्ताने आऊट डोअर डॉक्स स्टाफच्या वतीने त्यांचा ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज यांच्या हस्ते इंदिरा डॉक येथील हमालेज कॅन्टीन येथे सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये ,मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, दत्ता खेसे, प्रसिद्धिप्रमुख मारुती विश्वासराव, बंधुत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर राणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट एस. सी. एस. टी. वेल्फेअर असोसिएशनचे संघटक चिटणीस संजय बढेकर, युनियनचे कार्यकर्ते गणेश पोळ, हेमंत वरळीकर यांची शुभेच्छापर भाषणे झाली. अपर्णा रणदिवे, कुमार युगंधर रणदिवे, सई रणदिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर सत्काराला सत्कारमूर्ती विजय रणदिवे यांनी उत्तर दिले.