| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील एका डॉक्टरची 88 हजसा रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल शहरातील 60 वर्षीय डॉक्टरांना त्यांच्या मोबाईवर एक मेसेज आला होता. त्यात पॅकेज डिलीव्हरी बाबत सांगून लिंक पाठवून त्या मध्ये माहिती भरण्यास सांगितले. तसेच, अजून काही लिंक व प्रोसेसिंग सांगून त्यांच्या बँक खात्यातून 88 हजार 790 रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यात वळती करण्यात आली. हे त्यांच्या निदर्शनस येताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
डॉक्टरची हजारो रुपयांची फसवणूक

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606