रसायनीतील डॉक्टरांची पंढरपूर येथे सेवा

हजारो वारकर्‍यांची मोफत आरोग्य तपासणी
| रसायनी | वार्ताहर |

रसायनीतील डॉक्टरांनी एकत्रित येऊन प्रायमा असोसिएशनची स्थापना केली आहे. या डॉक्टर असोसिएशनकडून ठिकठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी मोफत आरोग्यविषयक शिबीर, विविध आजारांवर मार्गदर्शन, मोफत औषधोपचार आदी कार्य केले जाते. मागील वर्षी महाड पूरग्रस्त भागातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे महत्त्वाचे काम या रसायनीतील प्रायमा असोसिएशनने केले आहे. यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त डॉक्टरांनी वारकर्‍यांसाठी मोफत तपासणी करून मार्गदर्शन केले.

यावेळी प्रायमाचे अध्यक्ष डॉ. संजय कुरंगळे, माजी अध्यक्ष डॉ. रोहित कदम-पाटील यांच्या प्रयत्नाने भारत सेवा संघ या संघटनेच्या माध्यमातून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे आलेल्या वारकर्‍यांसाठी आरोग्य सेवा देण्याचे काम हे करण्यात आले. वारकर्‍यांची सेवा हीच ईश्‍वरसेवा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आरोग्य सेवा ही प्रायमा डॉक्टर असोसिएशनकडून देण्यात आली. दरम्यान, डॉ. संजय कुरंगळे, डॉ. धीरज जैन, डॉ. रोहित कदम-पाटील, डॉ. राहुल यादव, डॉ. प्रशांत जगताप, डॉ. बिलास कुलकर्णी, डॉ. युवराज यांनी ही सेवा केली. हजारो वारकर्‍यांनी या सेवेचा लाभ घेतला.

Exit mobile version