। पेण । वार्ताहर ।
इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनीरिंगतर्फे डॉ.संदीप घरत यांना संशोधन शिष्यवृत्ती अवॉर्ड नुकताच जाहीर झाला आहे.
मेंटोरिंग ऑफ इंजिनीरिंग टीचर्स स्वरूपाची या शिष्यवृत्ती अंतर्गत देशातील सर्वोच्च मानल्या जाणार्या इंन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजी मुंबई संस्थेत काम करण्याची त्यांना संधी प्राप्त झाली आहे. तसेच पावडर अॅड ग्रेन्स या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांच्या शोधनिबंधनाची निवड झाली आहे. ही परिषद अर्जेंटींना देशातील बार्सी लोना येथे जुलै महिन्यात आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे ही परिषद ऑनलाईन घेण्यात येणार आहे. डॉ.संदीप घरत हे सध्या घरडा अभियांत्रिकी कॉलेज खेड येथे केमिकल विभागत प्राध्यापक आणि उपडीन शैक्षणिक म्हणून कार्यरत आहेत.
डॉ.संदीप घरत हे नेहमीच विद्यार्थ्याना उत्कृष्ट मार्गदर्शन मिळावे म्हणून धडपडत असतात. त्यांनी आतापर्यत घरडा कॉलेज मधील 59 विद्यार्थ्याना इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी मुंबई येथे ट्रेनिंगसाठी पाठवले आहे. त्यांचे पेण तालुक्यातून कौतूक होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.