| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत मेडिकल असोसिएशन आयोजित केएम्ए फ्रेंडशिप कप 2023 ह्या डॉक्टरांसाठी टेनिस क्रिकेट स्पर्धेत बोलताना अलिबाग संघाचे डॉ. राजाराम हुलवान यांनी डॉक्टरांच्या आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळण्याची गरज असल्याचा कानमंत्र दिला.
कर्जत मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन भोपतराव यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रशांत गांगल, डॉ. निलेश म्हात्रे, रायगड मेडिकल असोसिएशनची डॉक्टर प्रिमियर लिग ची कल्पना प्रथम 2005 मध्ये प्रत्यक्षात आणणारे कर्जत मेडिकल असोसिएशन चे संस्थापक सदस्य डॉ. आशुतोष कुलकर्णी आणि कॅबिनेट सदस्य ह्यांनी ह्या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले. अलिबाग, बदलापूर, कल्याण आणि कर्जत येथील प्रतिथयश डॉक्टरांच्या संघानी यात सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात बदलापूर संघाने फ्रेंडशिप कप जिंकला. यजमान कर्जत संघ उपविजेता ठरला. मॅन ऑफ द सिरीज डॉ. कुलदीप इंगोले, स्पर्धेतील उत्तम गोलंदाज म्हणून डॉ. विनय सांगळे, उत्तम फलंदाज म्हणून बदलापूर चे डॉ. आशीष यादव यांना पुरस्कार मिळाला.
तसेच कर्जत महिला डॉक्टरांचे बॉक्स क्रिकेटचे सामनेही आयोजीत करण्यात आले होते. यावेळी रत्नराज नर्सिंग होमचे डॉ. प्रेमचंद जैन, मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. दिग्विजय पवार, डॉ. विलास सरोदे, डॉ. हेमंत शेवाळे, रायगड मेडिकल असोसिएशनचे इलेक्ट प्रेसिडेंट डॉ. निशिगंध आठवले, केएम्ए माजी अध्यक्षा डॉ. शर्वाणी कुळकर्णी आणि कर्जत मधील अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.